Tractor subsidy : ट्रॅक्टर अनुदान 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, अर्ज सुरू मिळणार 3.50 लाख रुपये अनुदान - covers

marathi news update and marathi agriculture news update on this website.

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

Tractor subsidy : ट्रॅक्टर अनुदान 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, अर्ज सुरू मिळणार 3.50 लाख रुपये अनुदान


महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णय क्रमांक एसटीएस- 2011/प्रक्र439/अजारक-1 दि. 6 डिसेंबर 2012 आणि सामाकि न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णय क्रमांक एसटीएस-2016/ प्रक्र 125/अजाक मुंबई दि. 8 मार्च 2017 अन्वये लाभार्भीचे पात्रतेचे निकष ठरविण्यताआले आहेत. 


योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे

  • अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत, 
  • स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. 
  • स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील असावेत, 

मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वयहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रु.3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील, लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटानी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल मात्र त्याची या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना ( रु. 3.15 लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबंधित बचत गटाने स्वत: खर्च करावी.स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बॅकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न करावे, 

अर्ज कसा व कोठे करावा 

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करुन सविस्तर माहिती पहा




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा