कुसुम सोलर पंपचा नवीन कोटा आला करा अर्ज | Kusum Solar Pump Yojana 2022 - covers

marathi news update and marathi agriculture news update on this website.

रविवार, २४ एप्रिल, २०२२

कुसुम सोलर पंपचा नवीन कोटा आला करा अर्ज | Kusum Solar Pump Yojana 2022

प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत 90 ते 95 टक्के अनुदान दिलं जातं. तर आपण वरील माहिती मध्ये पाहिले की कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान आहे. तर आता जाणून घेऊया किती किती जमीन असलेल्या शेतकऱ्यांना किती एचपीचा पंप हा दिला जाणार आहे. तर सर्वप्रथम 2.5 एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3 एचपीचा पंप दिल्या जाणार आहेत. तसेच 5 एकर शेतजमीन धारकास 5 एचपी पंप दिले जाणार आहे. आणि त्यापेक्षा जास्त जमीन धारकास 7.5 एचपी चा पंप दिला जातो. आणि यासाठी 90  ते 95 टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येते.

PM कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ 

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही एक केंद्र सरकारची योजना आहे. सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% अनुदान दिले जाते. तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळते. तर या योजनेचा फायदा असा आहे. तर आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी विजेची गरज आता नाही. आपण सोलर ऊर्जा वर मोटार चालू शकता. शेतकऱ्यांनो आणि यामध्ये कोणत्या प्रकारचे लोडशेडिंग, व अन्य प्रोब्लेम येत नाही. आणि शेतकऱ्यांची आर्थिक बचत होते.

पीएम कुसुम सोलर पंप योजना कागदपत्रे 

सोलार पंप योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे आवश्यक आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम सातबारा त्याचं विहीर. किंवा कूपनलिकांचा शेतात असल्याचा सातबार्यावर नोंद आवश्यक आहे. तसेच भोगवटदाराचे ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयांचा मुद्रांक कागदावर आवश्यक आहे. तसेच भोगवटदाराचे ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयांचा मुद्रांक कागदावर सादर करावा लागणार आहे. व आधार कार्ड झेरॉक्स प्रत लागणार आहे. तसेच रद्द केलेले धनादेश किंवा बँक पासबुक झेरॉक्स प्रत लागणार आहे. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र लागणार आहे. शेत जमीन विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यास त्याच्या भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र. इत्यादी कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करण्यास आवश्यक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा