Ek Shetkari Ek DP Yojana: शेतकऱ्यांना शेतात पिकांना पाणी देत असताना, अनेक अडचणी येत असतात. शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडल्यास, मोठ्या अडचणीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. विद्युत पुरवठामध्ये बिघाड होणे, वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी, विद्युत अपघात अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना समोर येत असतात.
Ek Shetkari Ek DP Yojana
या सर्व अडचणीवर शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. राज्यातील सरकार देखील यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेतकर्यांना त्यांची स्वतःची डीपी घेऊ शकतात. ज्या नविन कृषीपंप अर्जदाराच्या कृषीपंपाचे अंतर, नजीकच्या लघुदाब वाहिनी पासून २०० मीटरपेक्षा जास्त आहे. परंतु उच्चदाब वाहिनी पासुन ६०० मीटरच्या आत आहे. अशा नविन कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीवर वीज जोडणी देण्यात येणार आहे. उच्चदाब वाहिनी पासून ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास पारेषण विरहीत (Off Grid) सौरऊर्जेवर चालणारे कृषीपंप देण्यात येणार आहे.
एक शेतकरी एक डीपी योजना 2022
आता राज्य सरकार उच्च दाबाची वीज देणार आहे. या लेखात तुम्हाला खास योजनेविषयी माहिती देणार आहोत. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या वीज बाबत सर्व समस्या दूर होणार आहे. तर या योजनेबद्दल जाणून घेऊया.
राज्य सरकार ‘एक शेतकरी एक डीपी’ योजना राबवित आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी CSC केंद्रांत जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.
‘एक शेतकरी एक डीपी’ योजनेची उद्दिष्टे काय आहे, योजनेचा लाभ, कागदपत्रे कोणती लागणार, अर्ज कुठे व कसा करायचा अशी सर्व माहिती जाणून घेऊया.
हेही वाचा : pm kisan yojana पीएम किसान योजना 6000 हजार ऐवजी मिळणार आता 11000 हजार रुपये
योजनेचा लाभ
ज्या शेतकऱ्यांनाकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे, त्या शेतकऱ्यांना प्रति एचपी 7 हजार रुपये द्यावे लागतील.
अनुसूचित आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रति एचपी 5 हजार रुपये द्यावे लागतील.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- 7/12 उतारा
- जात प्रमाणपत्र
- बॅंक खाते
असा करा ऑनलाईन अर्ज
सर्वप्रथम https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest&Lang=Marathi या लिंकवर क्लिक करून वेबसाईट ओपन करा.
- तिथे भाषा निवडून, खालील कृषी ऑप्शनवर क्लिक करा.
- नवीन अर्जाची नोंदणी हा ऑप्शन निवडा.
- त्यानंतर तुम्हाला किती HP ची DP हवी आहे (3/5/7) ऑप्शन निवडा.
- नंतर, ‘”कृपया शेती पंप वीज पुरवठ्यासाठी खालील पैकी योजना निवडा” यामध्ये दोन ऑप्शन तुमच्यासमोर दिसतील. 1) पारंपरिक वीजपुरवठा 2) सौर ऊर्जा तर आपल्याला ‘पारंपरिक वीजपुरवठा’ पर्याय निवडायचा आहे.
- नंतर अटी व शर्ती यामध्ये दिसतील त्यामधील दुसरा पर्याय निवडून सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.
- समोरील येणार ऑप्शन वाचून ok ऑप्शनवर क्लिक करा.
- पुन्हा तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. 1) individual 2) organization यामधील पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा.
- अर्जाची शेवटी Generate OTP या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर अर्थात टाकलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला अर्जामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर ok ऑप्शनवर क्लिक करा.
- अर्जाची प्रिंट काढून तुमच्याजवळ सांभाळून ठेवा. तुमचा नंबर आल्यानंतर तुमच्या मोबाईलवर किंवा ई-मेल आयडीवर मॅसेज येईल. (Ek Shetkari Ek DP Yojana Online Apply)
अशाप्रकारे ‘एक शेतकरी एक डीपी’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील या योजनेचा लाभ घ्या. ही माहिती पुढे शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा